Tuesday, August 15, 2017

गरज महानगर नियोजन संस्थांची


नुकतीच बातमी वाचण्यात आली की पुण्याच्या आसपासच्या गावांचा समावेश पुणे शहराच्या हद्दीत करण्यात येणार आहे. मागच्या वेळेस झाल्येल्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट २३  गावांकडे पुणे महानगरपालिकेला लक्ष पुरवता येत नाहीये. मनपा चा विकास आराखडा १९८७ नंतर मंजूर झालेला नाहीये आणि शासन अजून काम मनपा कडे सोपवत आहे. निर्णय चुकीचा की बरोबर या चर्चेमध्ये मला रस नाही पण पुण्यासारखीच परिस्थिती बाकीच्या महानगरपालिकांची आहे. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या गावांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. परंतु ती गावे नागरी सुविधांचा पुरवठा करण्यास मात्र समर्थ ठरत नाहीत.  अशाने वेळ येती त्यांचा समावेश मनपा हद्दीत करायची. आणि मनपा हद्दीत समावेश करूनही त्यांच्यापुढील समस्या काही सुटत नाहीत. या दृष्टीकोनातून विचार केला तर आता शासनाने काही वेगळे करून पाहण्यास हरकत नाही. मुंबई साठी १९७५ पासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे. एम एम आर डी ए ने मुंबईच्या दळणवळण सुविधांच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याच धरतीवर प्रत्येक महानगरासाठी एक एक  महानगर नियोजन संस्था उभारता येईल. एक मध्यवर्ती संस्था जी शहराबरोबरच आजूबाजूच्या गावांच्या नियोजनासाठी आराखडे बनवेल. कोणतीही दळणवळण योजना या पूर्ण विभागाला कशी लागू करता येईल ते ठरवेल. सुनियोजित नागरीकरणासाठी अशा संस्था आता अत्यावश्यक झाल्या आहेत.

अमेरिकेत १९६२ मध्ये केंद्रीय महामार्ग मदत (Federal - aid highway act) कायद्याअंतर्गत शहरी नियोजन संस्थांची  (Metropolitan Planning Organization MPO) मुहूर्तवेढ रोवली गेली. याअंतर्गत कोणताही नागरी विभाग म्हणजे शहर आणि आसपासचा प्रदेशाची लोकसंख्या ही ५०,००० च्या पुढे गेली की त्या प्रदेशाकरता एक महानगर नियोजन संस्था (Metropolitan planning organization - MPO) स्थापन करणे आवश्यक केले गेले.  या संस्थेच्या बोर्डावर त्या प्रदेशात असलेल्या गावांचे प्रतिनिधित्व असेल.  आणि ही संस्था केंद्रसरकार आणि नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचयती यांच्यामधला दुवा असेल. प्रत्येक MPO दर पाच वर्षांनी एक भविष्यातील विकासाचा आराखडा  बनवते.  या आराखड्यामध्ये  पुढील २० वर्षांमध्ये मूळ शहराची वाढ आणि आजुबाजूच्या गावांची वाढ कशी होणे अपेक्षित आहे हे समाविष्ट असते. त्याचबरोबर या वाढीमुळे दळवळण सुविधेवर काय परिणाम होणार ते ही पाहिलेले असते. या मध्ये जर खुप वेगाने वाढ दिसते आहे असे दिसले तर मग त्यांच्यावर उपाय म्हणून नविन रेल्वे, रस्ते, बस वगैरे उपक्रम राबवण्याचा आराखडा तयार करण्यात येतो.  आणि आधी सांगितल्याप्रमाणे या आराखड्याचा दर पाच वर्षांनी आढावा घेतला जातो. म्हणजे जर   परिस्थितीमध्ये काही बदल झाले असतील तर वेळीच उपाययोजना करता येतील. जर एखाद्या गावाची वाढ जास्ती दिसते आहे तर त्यानुसार दळणवळणाचे   निर्णय घेता येतात.

भारतात आपल्याला सध्या झपाट्याने शहरीकरण / नागरीकरण होताना दिसते आहे. लोकसंख्या  खेड्यांकडून शहरांकडे धावते आहे आणि हा प्रवाह आता बदलता येण्यासारखा नाही. त्यामुळे  उलट आपण हे नागरीकरण सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. भारतात अजुनही आपण दळणवळण सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो  आहोत. त्यामुळे हा योग साधून अशा महानगर नियोजन संस्था  स्थापन केल्या तर जो काही विकास होईल तो बरोबर  दिशेने होईल.  या संस्था प्रत्येक नागरी विभाग  जो १,००,००० लोकसंखेपेक्षा मोठा असेल अशा विभागांमध्ये स्थापन करता येतील. याविभागांमध्ये एक  किंवा अधिक महानगरे आणि त्याचबरोबरीने आसपासची छोटी गावे आणि खेडी  अशा सर्वांचा समावेश असेल.  अशा संस्था स्थापन केल्या तर त्या  छोट्या गावांना तांत्रिक सहाय्य पुरवठा सुद्धा करू शकतात. काही गावांकडे आपला आराखडा बनवण्याकरता उपयुक्त मनुष्यबळ नसते. त्यांना काही उपक्रम माहिती नसतात. अशांना या संस्था मदत करू शकतील. याचवेळेस आपण अमेरिकेत  केलेल्या  चुकांपासून काही शिकण्याचीही गरज आहे. नविन  संशोधनानुसार नुसते  रस्ते बांधून किंवा लेन्स ची संख्या वाढवून ट्रॅफिक कमी होतच नाही. उलट तुम्ही बांधा ते येतील या   गृहितकाने वाहनांची संख्या वाढतच जाते. त्यामुळे ट्रेन्स - बसेस यांसारख्या मास ट्रांझिट सुविधांचा वापर महत्त्वाचा आहे. उगीच रस्ता रूंदीकरण करत बसण्यापेक्षा आपल्या रेल्वे, मेट्रो , चांगली बस / टॅक्सी सिस्टीम उभी करण्याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शहरांची वाढही त्यादृष्टीने पुरक होणे गरजेचे आहे. या संस्था अशी पुरक वाढ करण्यात खचितच मदत करतील.



(सोर्स: https://www.bloomberg.com/news/articles/2017-08-10/sprawl-can-be-beautiful-if-cities-learn-to-manage-growth )


आता पुण्याचे उदाहरण घेतले तर पुण्याचे स्वरूप अगदी २० वर्षांपूर्वी पाहिले तर अगदी आटोपशीर होते. पुणे  आणि पिंपरी - चिंचवड मध्ये  एक सीमा असल्यासारखी होती. पण आता पुणे कुठे संपले आणि पिंपरी-चिंचवड कुठे सुरू झाले हे कळेनासे झाले आहे. त्यापुढे एका  बाजूला हिंजवाडी  , दुसर्‍याबाजूला  वडगांव धायरी ,   तिसर्‍या बाजूला मगरपट्टा , ते चौथ्या बाजूला वाघोली असा पूर्ण एक मोठा आणि एकसंध महानगर प्रदेश  निर्माण झालेला आहे. पण ही वाढ होत असताना त्याचा ताळमेळ राहिला नाही त्यामुळे पुण्यातून किती लोक हिंजवडीला येजा करतील हे कोणी विचारातच घेतले नाही. आणि आताची हिंजवडीच्या ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली.  जर अशी महानगर नियोजन संस्था असती  तर तिने हिंजवडी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा नगरपालिकांना एकत्र   बसवून निर्माण होणार्‍या  वाहतूकीवर  मार्ग काढला असता. जर पुढच्या १० वर्षांमध्ये १५,००० लोक  वाहतूक करणार  आहेत तर आपण नविन बस सुरू करावी  किंवा रेल्वे सुरू करावी आणि लोकांना काही ठिकाणं द्यावीत की तिथे ते आपापली वाहने पार्क करून पुढे हिंजवडीत कामावर येतील. अशा तर्हेचे निर्णय घेता आले असते.

अजूनही वेळ  गेलेली नाही.  अशा समस्या इतर ठिकाणी आणि इतर शहरांमध्ये निर्माण होऊ नयेत  म्हणून महानगर नियोजन संस्थांची गरज आहे!

(अजून माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Metropolitan_planning_organization )

Friday, April 22, 2016

Because of Baran .. या बरान मुळे

Baran, a great movie by Majid Majidi. I was fond of Bollywood movies but because of Baran I started watching world cinema and it opened a new chapter of movie watching to me. I will always be grateful to Majidi and Baran for this ! 

या बरान मुळे बर्‍याच गोष्टी घडल्या आहेत लाईफ मध्ये. वेगवेगळे पिक्चर्स पहायची सवय यामुळेच लागली. फेस्टिव्हल वारी करायची पण. २ र्या वर्षाला पिफ मध्ये बरान दाखवणार होते त्यामुळे आम्ही आयनॉक्स वर पोचलो. तेव्हा कळले की पिफ चे डेलिगेट व्हावे लागते आणि मग ढिगानी मस्त पिक्चर पहाता येतात. त्यादिवशी "आया हू तो कुछ तो लेके ही जाऊंगा" या गोगो च्या फंड्याने बरान नाही तर "द गुरू" पाहिला 

पण मग नंतरच्या वर्षी पिफ गाजवला. भरपूर पिक्चर पाहिले. पेज ३ चा प्रिमियर पाहिला ई-स्क्वेअर मध्ये पायर्‍यांवर बसून. बंदी घालण्यात आलेला ब्लॅक फायडे पाहिला, बरेच ब्राझिलियन, फ्रेंच, आणि इतर देशांचे चित्रपट पाहिले.

दुसर्या वर्षी आर्काईव्ह्ज मध्ये कागज के फुल आणि साहब,बिबी और गुलाम पाहिला. श्वास आणि साऊथ अफ्रिकेचा यस्टरडे पाहिला. आणि माझ्या जिवनात कोरियन चित्रपट पहायला सुरूवात करून देणारा इनोसंट स्टेप्स पण पाहिला. आम्ही असू लाडके पण पाहिला. डोर चा ओरिजिनल मल्याळी चित्रपट पाहिला ज्यात मान्सुन च्या पावसाला पण एक कॅरॅक्टर आहे. एकाच दिवशी ५ चित्रपट कसे बघता येतात आणि ते वेगवेगळे कसे एंजॉय करता येतात त्याचा शोध लागला.

हे चित्रपटांचे वेड इथे येऊन अजुन वाढले आणि मस्त फोफावले आहे. अजुनही बरेच चित्रपट पहातोच पण या सगळ्याची सुरूवात त्या बरान मुळे झाली 

Monday, February 17, 2014

धिंगाणा बंद Dhingana Closed!!

अखेर ७ वर्षांनंतर धिंगाणा डॉट कॉम बंद झाले. प्रेम दिनाच्या दिवशीच त्यांनी अखेरचा राम राम केला. अनेक मराठी रसिकांचे हक्काचे गाणे ऐकण्याचे ठिकाण बंद झाले. पडद्यामागच्या हालचाली आपल्याला काय माहिती पण स्वप्नील आणि स्नेहल या शिंदे बंधूनी सुरु केलेले आणि भारतात कायदेशीरपणे संगीत ऐकण्याचे हे प्रथम स्थळ होते. 

मला आठवतंय २००७ मध्ये पुण्यात आय टी मध्ये नवीनच भारती झालेले आम्ही मिट कॉन च्या इमारतीत प्रशिक्षण घेत होतो. सगळेच नुकतेच महाविद्यालयातून बाहेर पडलेले, वेगवेगळ्या गावातून आणि राज्यांतून आलेले सगळेच जन तसे संगीताचे चाहते होते. पण आता इकडे कॉलेज सारखे गाणे ऐकणे जमणार नव्हते तेव्हा एका मित्राने धिंगाणा दाखवली आणि मग आमचे रोजचे गाणी ऐकणे सुरु झाले. त्याकाळी जेव्हा टोरांट जोरात होते आणि कायदेशीर असे काही मिळते हे माहिती नव्हते तेव्हा हा गाण्यांचा खजिना हातात पडला आणि आनंद झाला. 

त्यानंतर इकडे एम एस करायला आल्यापासून तर धिंगाणा कायमचा सोबती बनला. आमचा जुन्या गाण्यांचा छंद धिंगाणा निश्चितपणे पूर्ण करायचा. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी गाण्यांचा संग्रह. धिंगाणा मराठी गाण्यांसाठी हक्काचे माहेर घर होते. पुढे पुढे तर बर्याच चित्रपटांच्या यशामध्ये धिंगाणा च्या गाण्यांचा महत्वाचा वाट राहिला आहे. टाईम पास, दुनियादारी, बालक पालक अश्या यशस्वी चित्रपटांचे संगीत सुरुवातीला धिंगाणा वरच प्रकाशित झाले. धिंगाणा चा अजून एक विशेष म्हणजे त्यांचे android आणि आय फोन आप. इतके सुंदर आणि वापरायला सोपे अजून कुठलेच नाही सध्या तरी. 

वाटले होते मराठी चित्रपट आणि त्यांच्या हातात हात घालून धिंगाणा असेच मोठे होतील पण अखेर त्यांनी निरोपच घेतला. अखेरच्या दिवसांत त्याचा टी सिरीज आणि बाकी कंपन्याशी काही वाद सुरु झाला होता आणि नवीन गाणी येणे ही बंद झाले होते. आता कळले ती शेवटची घर घर होती. असा धिंगाणा परत सुरु व्हावा अशी इच्छा तर आहे पाहू काय होतंय ते …                      

Thursday, November 7, 2013

Inspiration

Hi all,

Have you ever thought that everything created in this world has some sort of inspiration behind it. There is only pure thing is nature.  All sorts of creations paintings, poems, music - everything is inspired from something. 

But the important part it to find your own inspiration. Get inspired from a person, an art or something from beautiful nature and create your mark. I'm not saying it should be something artistic. Though it can be something in your work or study or daily life, creating the your style is important. Otherwise you will be one of the sheep in the group who follows the leader goat.

Enjoy!!

Thursday, August 15, 2013

The Soul of Bread

Everyday we do things - sometimes we try to win something - sometimes we try to gain something - most of the times we have certain reward or return in our mind from doing that thing...  The soul of bread tells you the story of a baker who understands without any recognition in mind and without any special ingredient - the best bread is made with the sincere heart!

It's been a long time since I wrote my last post but this Taiwanese movie made me! "The Soul of Bread", made in 2012, is a simple story of a small town bakery in Taiwan. Just like their message they make a very pure, down to earth movie. The portrayal of that small town is really picturesque. The town acts as an another actor and takes part in the story. I don't want to go in the detail of the story or describe about it. If you find it, I would recommend you to watch it.

At the end I want recite the master baker's words - he tells that he made the bread only for his wife - putting all his heart in it. His apprentice realizes it and bakes a simple bread but puts his heart in the making - thus the climax.

Well, if we put our heart and sincere efforts in whatever we are doing and just forget about the returns - I guess everything in this world will become the best!