Friday, April 22, 2016

Because of Baran .. या बरान मुळे

Baran, a great movie by Majid Majidi. I was fond of Bollywood movies but because of Baran I started watching world cinema and it opened a new chapter of movie watching to me. I will always be grateful to Majidi and Baran for this ! 

या बरान मुळे बर्‍याच गोष्टी घडल्या आहेत लाईफ मध्ये. वेगवेगळे पिक्चर्स पहायची सवय यामुळेच लागली. फेस्टिव्हल वारी करायची पण. २ र्या वर्षाला पिफ मध्ये बरान दाखवणार होते त्यामुळे आम्ही आयनॉक्स वर पोचलो. तेव्हा कळले की पिफ चे डेलिगेट व्हावे लागते आणि मग ढिगानी मस्त पिक्चर पहाता येतात. त्यादिवशी "आया हू तो कुछ तो लेके ही जाऊंगा" या गोगो च्या फंड्याने बरान नाही तर "द गुरू" पाहिला 

पण मग नंतरच्या वर्षी पिफ गाजवला. भरपूर पिक्चर पाहिले. पेज ३ चा प्रिमियर पाहिला ई-स्क्वेअर मध्ये पायर्‍यांवर बसून. बंदी घालण्यात आलेला ब्लॅक फायडे पाहिला, बरेच ब्राझिलियन, फ्रेंच, आणि इतर देशांचे चित्रपट पाहिले.

दुसर्या वर्षी आर्काईव्ह्ज मध्ये कागज के फुल आणि साहब,बिबी और गुलाम पाहिला. श्वास आणि साऊथ अफ्रिकेचा यस्टरडे पाहिला. आणि माझ्या जिवनात कोरियन चित्रपट पहायला सुरूवात करून देणारा इनोसंट स्टेप्स पण पाहिला. आम्ही असू लाडके पण पाहिला. डोर चा ओरिजिनल मल्याळी चित्रपट पाहिला ज्यात मान्सुन च्या पावसाला पण एक कॅरॅक्टर आहे. एकाच दिवशी ५ चित्रपट कसे बघता येतात आणि ते वेगवेगळे कसे एंजॉय करता येतात त्याचा शोध लागला.

हे चित्रपटांचे वेड इथे येऊन अजुन वाढले आणि मस्त फोफावले आहे. अजुनही बरेच चित्रपट पहातोच पण या सगळ्याची सुरूवात त्या बरान मुळे झाली 

No comments:

Post a Comment