झेंडा - काठीवर लटकवलेले रंगीत कापड - इतकाच अर्थ आहे याचा - की हे आहे प्रतिक - हो आपण सगळ्यांनी नागरिक शास्त्रामध्ये भारताच्या झेंड्याचा अर्थ समजून घेतला असेलच आणि आपल्याला माहिती असेलच की ते रंग काय सांगतात आणि ती चिन्हे काय बोलतात. पण आता एक नाही तर हजार झेंडे झाले आहेत अवती भोवती - जितके लोक तितक्या अस्मिता - तितकी प्रतीके आणि तितकेच झेंडे ...
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ... ?
ज्ञानेशवर मेश्राम चा स्वर लागतो आणि आजच्या मराठी तरुणाच्या मनातला प्रश्नच तो हृदयाला भिडवतो. पण खरच हा काही फ़क्त मराठी तरुणाचा प्रश्न आहे का ? मला नाही वाटत - आज काल बरेचसे तरुण मग ते मराठी - तेलुगु किंवा अजुन दुसऱ्या देशातील असोत सगळे कुठल्या तरी झेंड्याच्या शोधात आहेत( जरी इतके झेंडे आहेत आजूबाजूला) अणि तो त्याना मिळत नाहीये - मिळाला तरी दुसऱ्या ओळी प्रमाणे - "आजवर ज्यांची वाहिली पालखी - भलताच त्यांचा देव होता" - त्याना आपला आदर्शच सापडत नाहीये. आणि शेवटी लक्षात येते आहे की सगळे दगडच आहेत - कोणी खरा देव नाहीच.
मला काही अवधूत च्या सिनेमाची जाहिरात नाही करायची .. पण हे मला वाटते की सध्या तरी सामान्य तरुणासमोर काही आदर्श उरला नाही - हा काही टोकाचा निराशावाद नाही - पण आज कालचे आदर्श म्हणजे अंबानी आणि विजय मल्ल्या - पैसे मिळवणे वाईट नाही पण फक्त पैसे मिळवणे हा एकाच उद्देश ठेवणार का जीवनात. राजकारण पूर्वी समाजकारण असायचे म्हणे - मला काही माहिती नाही - मी तरी त्याला एक व्यवसाय म्हणूनच पहिले आहे - एक सामान्य परिस्थितीतील माणूस एका कार्यकालामध्ये एकदम २ गाड्यांचा मालक बनतो - मला कधी कधी नाही समजत. पूर्वीचे लोक काही गोष्टीं मधून भेटतात - साने गुरुजी वगैरे ज्यांनी समाजकारणासाठी आपले सर्वस्व सोडले - पण आहे असा कोणता आदर्श आज - कालच्या कार्यकर्त्यांपुढे ? कोणाला माहिती असेल तर कृपया कळवा ...
आता माझ्या बोलण्यावर बरेच लोक आक्षेप घेतील पण माझ्या डोळ्यासमोर तर हीच परिस्थिती दिसती आहे ... आणि हे सगळ्या जगातच आहे - भारत - चीन - अमेरिका - सगळीकडे तरुण लोक फक्त पैसा सर्वस्व मानून त्याच्या मागे पळताना दिसत आहेत - अर्थात निवड त्यांची आहे - पैसा की आयुष्य - आशावाद इतकाच की एखादा झेंडा पुढे मागे मिळेल आणि तरुणाई जरा कुठल्या तरी मार्गाला लागेल ...
आदर्श..... शब्द छोटा, पण त्याचे अर्थ मात्र मोठे.... "ज्या व्यक्तीचे गुण बघून ते आचरणात आणावेत" असा त्याचा अर्थ निघेल माझ्या मते... आजची पिढी गुण बघतीये अंबानी न मल्ल्या चे.... दुसऱ्याच्या खांद्यावर पाय देऊन पुढे जायचे.... माझे हे वाक्य कदाचित काही जणांना चुकीचे वाटेल.... पण व्यवसायातील ही सगळ्यात मूलभूत चाल आहे !
ReplyDeleteमग आपली पिढी तरी वेगळे काय करतीये ? भारतीयांना आदर्शापेक्षा गरज आहे तर एकमेकांची किंमत समजून, जाणून घेण्याची... एखादा नेता देशाची प्रगती कधी करू शकेल ? जेव्हा त्याची प्रजा एकजूट असेल तेव्हाच ना ! बर, आपल्याकडे सध्या चांगल्या नेत्यांची कमी आहे... पण चांगल्या लोकांची नव्हे ? राजकारण का आपल्या समाजाचा जीव घेतोये ? कारण आपल्यात एकता नाही ना ! हे वाक्य देखील काही जणांना खटकेल... परंतु हे सत्य आहे.... माझे उदाहरण चुकीच्या अर्थी घेऊ नका, पण हिटलर चे नाव इतिहासात फक्त त्याच्या कृरते बद्दल नव्हे, तर त्याची लोकांना एकजूट करण्याच्या शक्तीमूळे पण आहे... उगाच नाही जर्मनी मोठा होत गेला....
शेवटी, हे राजकारण भारताचा जीव तो पर्यंतच घेऊ शकते जो पर्यंत आपण एक होत नाही...अहो, हे राजकारणी तेच करतायेत जे ब्रिटीश करत होते... "divide & rule " !!!
त्यामुळे, "जागो इंडिया जागो" !!!
झेंडे अनेक आहेत हे कबूल, आणी प्रत्येकाला त्याचा झेंडा निवडायचा हक्का आहे.
ReplyDeleteसध्या जी परिस्थिति आहे आपल्या देशात त्यामुले तरुनांचा मार्ग चुकला असे वाटने
साहजिक आहे . पण आज आदर्श उरला नाही अशी स्तिथि नाही
. अरे बाबा आमटे होते त्यांची मुले आहेत ,दूर का सचिन तेंदुलकर आहे.
ढूंढो तो भगवान भी मिलते है. अणि हो देश जरी संत गतीने प्रगति करत असेल ना
तरी तो चांगल्या हाती आहे. आज जी पण प्रगति झाली आहे ती तरुण पीढ़ी योग्य
मार्गावर आहे म्हणून