Friday, July 3, 2009

मुक्त - चिंतन पण मराठीत

नमस्कार मित्रांनो,

ख़ास लोकाग्रहाकरीता हा लेख मराठी मध्ये लिहितो आहे ...

मराठी मध्ये लिहिनाता बरोबर कळ सापडली नाही म्हणुन चूका झाल्या आहेत तरीही समजुन घ्यावे

तसेही कालच ' मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ' बघून झालाय... सगळे बसले होते अणि मग चर्चा झाली थोडी फार ... आता मी त्या चित्रपटाची कथा सांगणार नाही माहिती आहे कही उपयोग नाही कारण बहुतेक सगळ्यानी तो माझ्या आधीच बघितला असणार .. पण माला तर तो चित्रपट खटकतो बुवा .. म्हणजे माला एकट्यालाच नाही पण आता जे माझे सवंगडी बसले होते माझ्या बरोबर त्याना पण थोडा फार नाही आवडला .. काय करणार ? आता सगळेच जण मराठी - हो म्हणा आता दूसरा कोण येउन हा चित्रपट पहिल ... बर ते राहू दया ... पण आता इतके चित्रपट येउन गेले पण हा कही त्यातला चांगला प्रयत्न आहे असे मला तरी नाही महानता येणार. कारण मी ' नायक ' पहिला (हिंदी आहे म्हणुन काही लोक माझ्यावर टिका करतील पण तो असाच होता - अन्यायाविरुद्ध बंड करणारा) शिवाजी राजे मध्ये जे दाखवले आहे ते तर आता तो मराठी असो किंवा दूसरा कोणी असो - जर त्याच्याकडे पैसे नसतील तर अशीच वागणूक मिळेल - उलट तो सदारयाच्या दुकानातला माणूस भोसलेंना ओळखतो - आता मला समीक्षक म्हनू नका किंवा टीकाकार ही पण हा जो कही सदरयाचा प्रसंग दाखवला आहे तो थोड्या फार फरकाने ( सदरया ऐवजी अत्तर) इरफान खान बरोबर ( मुंबई मेरी जान - परत हिंदी आला - याला न मराठी चित्रपटाची किंमतच नाही) घडतो.

मराठी अन्यायाबद्दलाच बोलायचे असेल ना तर खरच निशिकांत कामत ला दया (डोंबिवली फास्ट अणि हो मुंबई मेरी जान चा सुद्धा दिग्दर्शक) त्यानी ती चीड बरोबर मांडली आहे ... म्हणजे मी पैसे खात नाही अणि माझी अशी अपेक्षा असते की हे जग (जाऊ दया ना कशाला जगाकडे बघता) पण माझी दुनिया (हिंदी शब्द आला) - माझे घर - कार्यालय ईत्यादी ईत्यादी मध्ये जे लोक माझ्या बरोबर आहेत त्यानी पण जरा नीट वागावे ... माझा तुम्ही पैसे खायला आक्षेप नाही पण माझ्याकडून गैर कम करून घेऊ नये अणि आता असे नाही की साहेब अमराठीच असेल - तो मराठी ही असू शकतो - कारण आपल्याला लहानपण पासून ची शिकवण असते की बेटा नीट वागावे - देव बघत असतो - अणि मोठे होउन अपन जरी पूजा करणे वगैरे सोडले असले तरी ती शिकवण कही पुसली जात नाही ना ...

तर शेवटी सांगायचे म्हंटले तर मलाही आदर्शवाद अवाड्तो पण तो शिवाजी राजे सारखा नको - तो आदर्शवाद नाही ती एक परिकथा आहे - आणि माझा आक्षेप आहे जर त्या परिकथेवर विश्वास ठेवून - जर कोणी काही गैर करत असेल तर त्याला - शेवट नेहमी गोड असावा ( मलाही दुखांत आवडत नाहीत) पण तरीही शेवट हा माधव आपटे (डोंबिवली फास्ट) सारखाच होतो (हो त्या सारखाच अजुन एक शेवट - रंग दे बसंती) -

कोणीही उगीच हिंसेच्या मार्गाने जाऊ नये - हिंसा शेवटी वाईट - कितीही कोणालाही नाही आवडले तरी मला गांधीजींचे अहिंसा आणि आत्मसंतुलानाचे तत्वज्ञान आवडते - आणि माझी खात्री आहे (परत आशावाद - आशा, इच्छा दुःखाचे मुळ) एक दिवस परत लोक अहिंसेच्या मार्गाने जातील अणि हिंसा सोडून आदर्श समाज निर्माण करतील (थोडेसे धन्यवाद राजकुमार हिरानी ला ही - लगे रहो मुन्नाभाई मधून - वेगळ्या नावाने का होइना पण गांधीजींच्या तत्वज्ञानाला पुनर्जन्म दिल्याबद्दल)

अरे हो अणि अजुन एक गोष्ट - मला इकडे राहून कळती आहे ती म्हणजे - मराठी मध्ये शिका - शिकवा ( आपल्या मात्रुभाषेमध्ये शिकवा) नाही अहो इकडे त्यांच्या सोई करता स्पेनिश, जर्मन अणि चीनी जापानी मध्येही पाट्या असतात हो - आणि भारतीय मात्र इंग्रजी मध्ये बोलतात - नाही हे मात्र मला नाही पटत - विषयांतर होतय पण हा लेख नंतर कधी तरी लिहिन जरुर.

आणि माझे लेख हे मी सर्वानी वाचावे म्हणुन इंग्रजीतून लिहितो आपले आक्षेप जरुर कळवा ... मंडळ आपले आभारी आहे .